सामाजिक वनीकरण कार्यालयात माहितीचा अधिकार कार्यकर्तानीं दिले निवेदन..

एरंडोल/कुंदन सिंह ठाकूर. एरंडोल येथील सामाजिक वनीकरण कार्यालयात माहितीचा अधिकार अधिनीयम २००५ अन्वयेचा फलक व लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ व नागरिकांची सनद लावण्याबाबत माहितीचा अधिकार कार्यकर्तानीं निवेदन दिले.
निवेदन मध्ये फलकावर आवश्यक मजकूर खालील प्रमाणे असावा.
माहितीचा अधिकार अधिनीयम २००५ अन्वयेचा फलक व लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अन्वये आपल्या सामाजिक वनीकरण कार्यालयात दर्शनीय भागात जनमाहिती अधिकारी यांचे नांव , हुद्दा, संपर्क क्रमांक (दुरध्वनी क्रमांक), ईमेल आयडी आणि प्रथम अपिलीय अधिकारी यांचे नाव, हुद्दा , संपर्क क्रमांक (व्हॉइस नंबर), ईमेल आयडी, द्वितीय अपील अधिकारी, ,हुद्दा
संपर्क क्रमांक (दुरध्वनी क्रमांक), ईमेल आयडी असा फलक लावलेला दिसत नाहीत तरी हा फलक लावणे सर्व शासकीय कार्यालयांना बंधनकारक असल्याने सदर फलक न लावल्याने माहितीचा अधिकार अधिनीयम २००५ च्या कलम २८ चा भंग होत आहे. तरी अधिनयमाचा भंग होऊ नये
म्हणून आपण त्वरीत आपल्या सामाजिक वनीकरण कार्यालयामध्ये येत्या सात दिवसांत फलक लावण्याबाबत आपल्या स्तरावरून कारवाई करावी तसेच आम्हाला लावलेल्या फलकांचा फोटा देण्यात यावा. जर सात दिवसात सामाजिक वनीकरण कार्यालयामध्ये दर्शनीय भागात फलक लावलेला दिसला नाही तर तशी तक्रार वा विनंती पत्राची प्रत जोडून राज्य माहिती आयुक्त नाशिक खंडपीठ
यांच्याकडे करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
अश्या प्रकारे निवेदन देण्यात आले.या प्रसंगी
सीताराम आंनदा मराठे , तुषार सुभाष शिंपी
मनोज घनश्याम बिर्ला , राजधर महाजन, नितीन ठक्कर, उमंग ठक्कर, सोपान माळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.