स्वामी विवेकानंद यांच्या १६१ साव्या जयंतीनिमित्त,भव्य रक्तदान शिबिर..

एरंडोल/ प्रतिनिधि स्वामी विवेकानंद यांच्या १६१ साव्या जयंतीनिमित्त, तसेच अयोध्या येथे उभारल्या जाणाऱ्या भव्य राममंदिरात प्रभू श्री रामलल्ला च्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होत असल्यामुळे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष असल्याचे निमित्ताने विवेकानंद केंद्र कन्याकुमारी- शाखा एरंडोल व माधवराव गोळवलकर रक्तकेंद्र,जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .तरी सर्व रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवावा ही विनंती. रक्तदानाची तारीख/दिनांक :- २१ जानेवारी २०२४,रविवार, वेळ :-सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ठिकाण :-रा.ती .काबरे विद्यालय एरंडोल
विशेष सूचना:-पहिल्या १६१ रक्तदात्यांना २०२४ डायरी(किंमत ₹.१५०/-) रक्तदाना ची आठवण म्हणून
सप्रेम भेट दिली जाईल.
तरी ज्यांचे वय १८वर्षापेक्षा जास्त आहे,वजन ४० किलो आहे,व मागील ६ महिन्यात कोणताही आजार झालेला नाही अश्या सर्व महिला व पुरुषांना रक्तदान करता येईल.
विवेकानंद केंद्राच्या वतीने २०१२ पासून सातत्याने हा उपक्रम एरंडोल शहरातील व परिसरातील देणगीदारांच्या सहकार्याने राबविला जात आहे.तरी जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करून ह्या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे अशी विनंती विवेकानंद केंद्राच्या वतीने करण्यात येत आहे.रक्तदान हे महादान आहे.एका मानवाचेच रक्त दुसऱ्या गरजू मानवाला चालते.आजच्या युगात ते सर्वश्रेष्ठ दान मानले जाते.मानवी रक्ताला कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने रक्तदान करणे हा एकमेव पर्याय समाज्यापुढे आहे.
रक्तदान हे श्रेष्ठ दान
रक्तदान हे प्राणदान
रक्तदान हे जीवनदान