श्री गुरु देवदत्त मंदिरात स्वच्छता मोहीम.     अमळनेर तालुक्यातील पिंपळे येथे स्वच्छता करताना ग्रामस्थ.

0

अमळनेर/प्रतिनिधि

अयोध्येत होणाऱ्या प्रभु श्री राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून अमळनेर तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे येथे तीर्थ क्षेत्र असलेल्या श्री गुरुदेव दत्त मंदिर व तिघी गावांचा परिसरात कै. सुकलाल आनंदा पाटील माध्यमिक विद्यालय तर्फे स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेतून मंदिर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून चकाचक करण्यात आला. या स्वच्छता अभियानाचे भाविकांमधून स्वागत होत आहे. तर

परिसर स्वच्छ केल्याने समाधान व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री गुरुदेव दत्त मंदिर श्री चमत्कारी शनी मंदिर महादेव मंदिराचा परिसर यांचा मंदिरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वच्छता मोहिमेत
कै.सु आ पाटील माध्य विद्या.पिंपळे मुख्याध्यापक अशोक देसले व सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी गावातील सामाजिक कार्यकर्ता युवराज पाटील व लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील ग्रामपंचायत सर्व सदस्य
यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. मंदीर परिसर स्वच्छ झाल्याने चकाचक दिसत आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!