नॅशनल हायवेच्या ब्रिज पासून हॉट मिक्स डांबरी करणाला श्री अनिल अण्णा गोटे यांच्या शुभहस्ते शुभारंभ..

धुळे/प्रतिनिधि
माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांच्या विकासाच्या दूरदृष्टीच्या संकल्पनेतून अपूर्ण राहिलेल्या कामांना पुन्हा नव्या जोमाने नॅशनल हायवेच्या ब्रिज पासून हॉट मिक्स डांबरी करणाला श्री अनिल अण्णा गोटे यांच्या शुभहस्ते शुभारंभ करून सुरुवात … २५ कोटी १८ लाख मिळाले व त्यावेळी भाजपा सरकारने जाणीवपूर्वक दिले नव्हते आता मुख्यमंत्र्यांकडून मिळवले त्यामुळे मी या सरकारचा आभारी आहे असे श्री अनिल अण्णा गोटे यांनी निक्षून सांगितले.
सदर रस्ता हा कुमार नगरचा नॅशनल हायवे पूल पर्यंत दोन्ही बाजूंना साडेपाच साडेपाच किलोमीटरच्या माध्यमातून येणाऱ्या काळात धुळेकरां साठी पूर्णपणे तयार असणार आहे. आमचे सरकार होते पण अडीच वर्षांमध्ये त्यांनी अडीच रुपये सुद्धा दिले नाही तसेच धुळे शहरात येणाऱ्या काळात सफारी गार्डन व बारा माई पांजरा नदी ही दोन कामे मी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. याप्रसंगीश्री लोकसंग्रामचे कार्यकर्ते -दिलीप साळुंखे, अकबर अली सय्यद सर, डॉ अनिल पाटील सर, प्रशांत भदाने, विजय वाघ, सलीम भाई लंबू शेख, अविनाश लोकरे, डॉ संजय पिंगळे, प्रकाश जाधव, नितीन भामरे सर, मनीष थोरात, प्रवीण राणा, भैय्या बहाळकर, प्रकाश महानोर, दीपक जाधव भोला गोसावी, आबिद मणियार, सचिन पोतेकर, किशोर चौधरी, संजय ठाकरे, सुरेखाताई ठाकरे, ज्योतीताई चौधरी, नानापाठक, राजु कोठावदे, खलील अन्सारी, सादिक पठाण, मयुर खैरनार, सोमनाथ चौधरी, विशाल चित्ते, बंटी पाटील, पंकज वाघ, भूषण बागुल, पंकज नगराळे, चिलू अवळकंठे तसेच सदर कामाचे कॉन्ट्रॅक्टर ए बी आबा वाघ आदी उपस्थित होते..