रविवारपर्यंत आत्मसमर्पण करा
सर्वोच्च न्यायालयाचा दोषींना अल्टिमेटम..

24 प्राईम न्यूज 20 Jan 2023. येत्या रविवारी म्हणजेच २१ जानेवारीपर्यंत आत्मसमर्पण करा, असा अल्टिमेटम सर्वोच्च न्यायालयाने बिल्किस बानो सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील ११ आरोपींना दिला आहे. या प्रकरणातील ११ पैकी १० दोषींनी आत्मसमर्पण करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने हे स्पष्ट आदेश दिले. या प्रकरणातील ११ पैकी १० दोषींनी सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिका करीत आत्मसमर्पणासाठी मुदतवाढमागितली होती. यापैकी दोषी गोविंदभाई नाईक यांनी वडिलांच्या आजारपणाचे कारण देत आत्मसमर्पणाची मुदत ४ आठवड्यांनी वाढवण्याची मागणी यांनी मुलाच्या लग्नाचे कारण देत, तर दोषी मितेश चिमणलाल भट यांनी शेतीचा हंगाम असल्याचे कारण देत आत्मसमर्पण करण्यासाठी ६ आठवड्यांची मुदत देण्याची मागणी केली होती, परंतु मुदतवाढ मागण्या संदर्भातील या कारणांमध्ये तथ्य नसल्याचे कारण देत न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने या याचिका फेटाळून लावल्या.