राज्यात २२ जानेवारीला
सार्वजनिक सुट्टी..

0

24 प्राईम न्यूज 20 Jan 2023. अयोध्येतील राम मंदिरात येत्या २२ जानेवारीला श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. यानिमित्ताने राज्य सरकारने सोमवारी सार्वजनिक सुट्टी घोषित केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी यासंदर्भातील निर्णय जारी केला. सोमवारच्या सुट्टीमुळे आज शनिवारपासून सलग ३ दिवस सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत.
श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त केंद्र सरकारने अर्ध्या दिवसाची सुट्टी घोषितकेली आहे. तसेच विविध भाजपशासित राज्यांनी एक दिवसाची सुट्टी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही सुट्टी जाहीर करण्याची मागणी आमदारांनी केली होती. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने प्रस्ताव तयार करून तो मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी तयार ठेवला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिन म्हणून सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने आपल्या निर्णयात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!