रोहित पवार आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीने समन्स बजावले, जाणून घ्या कधी?

24 प्राईम न्यूज 20 Jan 2023. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आणि कोरोनाकाळात झालेल्या बॉडी बॅग कथित घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि मुंबईच्या माजी महापौर व ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे.
कोरोनाकाळात झालेल्या बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल असून याच गुन्ह्यात किशोरी पेडणेकर यांची यापूर्वी चौकशी झाली होती. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य सकारी बँकेतील कथित घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी अलीकडेच गुन्हा दाखल केला होता. या दोन्ही गुन्ह्यांत मनी लाँड्रिंग झाल्याचे उघडकीस आल्यानेईडीने या दोन्ही गुन्ह्यांचा स्वतंत्रपणे तपास सुरू केला आहे. अलीकडेच याच घोटाळ्यासंदर्भात रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीसह ५ कंपन्या, घर आणि कार्यालयावर ईडीने छापे टाकले होते. या छाप्यात घोटाळ्यासंदर्भातील काही दस्तावेज ताब्यात घेण्यात आले होते. या कागदपत्रां नंतर रोहित पवार यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे, तर किशोरी पेडणेकर यांच्याकडून अद्याप समन्स मिळाले नाही, असे सांगण्यात आले.
या दोघांनाही ईडीकडून समन्स मिळाल्याने शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटातील नेत्यांसह पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.