दोंडाईचा शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दैनावस्था..

दोंडाईचा प्रतिनिधी /रईस शेख
दोंडाईचा शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा शहरतुन जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दैनावस्था झाली आहे. मागील अनेक दिवसापासून दोंडाईचा या शहरात तून जाणारा जो मुख्य रस्ता आहे या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे हा रस्ता खराब झाला आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची ये जा होत असते. दोंडाईचा परिसरातील जवळपास दोंडाईचा शहरातुन जाणारा मुख्य मार्ग आहेत च्या संपर्क अनेक गावाशी येतो. विविध कामानिमित्त दोंडाईचा येथे नागरिकांची ये-जा सुरू असते.ऐंशी हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या दोंडाईचा या गावाच्या मुख्य रस्ता, जो नेहमीच वर्दळीचा असतो. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे झाल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. खड्डे चुकविण्याच्या नादात वाहन चालकांचे संतुलन बिघडते म्हणून संबंधित विभागाने दोंडाईचा गावातील मुख्य रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी दोंडाईचा शहराचे परिसरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.