जरांगेंची मुंबईकडे कूच ! हजारो मराठा आंदोलकांचा पाठिंबा.. गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही.. जरांगे पाटील

24 प्राईम न्यूज 21 Jan 2023. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवारी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेने येण्यासाठी आपल्या पायी दिंडीला सुरुवात केली. शनिवारी सकाळी आंतरवाली सराटीतून पायी दिंडीचे मार्गक्रमण झाल्यानंतर हजारो मराठा आंदोलकांनी यात आपला सहभाग नोंदवला. लातूर शहर-ग्रामीण, निलंगा, औसा, अहमदपूर, चाकूर उदगीर, देवणी, जळकोट, शिरूर आणि ताजबंद अशा अनेक गावांतून अनेक मराठा बांधव आंदोलनात सहभागी झाले.मी असेन किंवा नसेन, पण मराठ्यांमध्ये फूट पडून द्यायची नाही. छातीवर गोळ्या जरी घातल्या हटणार नाही. मराठ्यांची मुले संपवण्याचा घाट घातला जात लना आहे. मराठ्यांची मुले आत्महत्या करीत आहेत. तरीही ईच्या सरकार गांभीर्याने घेत नाही. उपोषणामुळे शरीर साथ देत डीला नाही, पण लढाई टोकाची आहे. आता आरक्षण घेऊन चाली मुलांच्या डोक्यावर गुलाल टाकायचा आहे.