राम मंदिर लोकार्पणापूर्वी जैश-ए-मोहम्मदची धमकी.. -मंदिराच्या लोकार्पणाला नक्षलवाद्यांचाही विरोध

24 प्राईम न्यूज 21 Jan 2023
राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या आधी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने धमकी दिली आहे. जैशने म्हटले आहे की, निर्दोष मुसलमानांच्या हत्येनंतर या मंदिराचे उद्घाटन केले जात आहे. या मंदिराची परिस्थिती ‘अल अक्सा मशिदी’सारखी होईल, अशी धमकी या दहशतवादी संघटनेकडून देण्यात आली आहे. –मंदिराच्या लोकार्पणाला नक्षलवाद्यांचा विरोध
राम मंदिर लोकार्पणाच्या सोहळ्याला नक्षलवाद्यांनी विरोध दर्शवला आहे. नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य क्रांतिकारी आदिवासी महिला संघटनेने याबाबत पत्रक काढले असून आम्हाला मंदिर नको तर रोटी, कपडा, मकान, शिक्षण आणि आरोग्य हवे असल्याचे सांगत या सोहळ्यावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे.