पिंपळे येथे श्रीराम पादुकांच्या पालखीची मिरवणूक व महाआरती..

प्रतिनिधी । अमळनेर
पिंपळे येथे सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने पिंपळे गावात प्रभु श्रीराम यांच्या प्रतीस्थापनेच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली असून
आजपासुन प्रत्येक घरावर दिवे लावले गेले
प्रत्येक घरासमोर सडा ,रांगोळी टाकण्यात आली
ह भ प मुकेश महाराज अम्बापिंप्रीकर याचा कीर्तनाचे कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता मोठ्या संख्येने सर्व ग्रामस्थांनी उपस्थितीत प्रभू रामचंद्रांचे भजन व कीर्तनाचा लाभ घेतला व आज सकाळी अयोध्या हुन आलेल्या आस्तकलश व रामपादुकाची पालखीची संपुर्ण गावात ढोलताषा व भजंनी मंडळ व रामधुन या मंत्र घोषणा देत तिघी गावातून मिरवणुक काढण्यात आली यावेळी प्रतेक घरासमोर सुंदरशा रांगोळ्या काढलेल्या दिसत होत्या प्रत्येक घरासमोर पाच दिव्य व घरावरच्या छतावरती भगवा झेंडे व भगवा रंगाचे पताके लावण्यात आलेले व घरावर श्रीराम असलेला ध्वज लावण्यात आला होता यावेळी महिलामंडळ गावकरी उत्सवास फुगडी नाचत होते संपूर्ण गावात भक्ती मय वातावरण तयार झाले होते निंबा दला चौधरी यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते
सध्याकाळी संपूर्ण गावातील सर्व ग्रामस्थांनी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींनी महाआरती चे आयोजन करण्यात आले