श्रीराम प्राणप्रतिष्ठानिमित्त संत सखाराम माऊली मित्र मंडळ आयोजित एक शाम राम कें नाम..

0

अमळनेर/प्रतिनिधि

अमळनेर येथील वाडी चौक परिसरात अयोध्या येथील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सकाळी राम विठ्ठल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करून कार्यक्रमास सुरुवात झाली यावेळी चांगल्या देखवायला ही लाजवेल अशी सजावट करण्यात आली. सायंकाळी संपूर्ण परिसरात दिवे लावून कार्यक्रमाची सुरुवात झाली संपूर्ण परिसरांत सळा टाकून सुंदर अशी रांगोळी टाकण्यात आली होती यावेळी भाऊ एडके, केशव पुरानिक, शारंगधर गुरुजी, प्रशांत जोशी, साहिल जोशी, आणि ज्ञानेश्वर पाठशाळे चे विध्यार्थी यांनी रामरक्षा स्तोत्र – आणी शांती पाठा चे वाचन केले. टाळ, मृदुंगांच्या गजरात संपूर्ण परिसर संगितमय झाला. रामराज्य काय उन्ये आम्हासी अशा अश्याच्या अभांगाने वारकरी शिक्षण पाठशाळेच्या विद्यार्थीनी म्हटलेल्या अभंगा ने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी प्रभू श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज आणि पांडुरंगाच्या मूर्तीला आकर्षक सुंदर फुलांची मनमोहक सजावट करण्यात आली होती.

प पूज्य प्रसाद महाराज विठ्ठल रुखुमाई संस्थान अमळनेर यांचे आशीर्वाद लाभले..
फटाक्याची आतिबाजी देखील करण्यात आली वाडी चौकात लावलेल्या भव्य आकाशकंदील लक्ष वेधून घेत होता. मंदिर परिसरात भगवे ध्वज लावून संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. भाविकांसाठी श्रीरामाची प्रतिकृतीही उभारण्यात आली होती. दिव्यांच्या आकर्षक रोषनाईने संपूर्ण परिसर लखलखाटत होता.
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी माऊली मित्र मंडळ,नेताजी मित्र मंडळ आणि परिसरातील नागरिकांचे सकार्य लाभले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!