आंतरशालेय क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न… -खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो निर्णय क्षमता, सहानुभूती, शिस्त आणि सहकार्याची भावना निर्माण होते.. – इर्शाद भाई जहागीरदार

धुळे/अनीस खाटीक

खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो निर्णय क्षमता, सहानुभूती, शिस्त आणि सहकार्याची भावना निर्माण होते या गुणांच्या बळावर व्यक्ति कोणतेही कार्य करण्यास सक्षम होतो असे मोलाचे विचार महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचे खंदे समर्थक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र सरचिटणीस मा. इर्शाद भाई जहागीरदार यांनी विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले प्रसंग होता यंग बॉईज एज्युकेशनल अँड इंडस्ट्रियल सर्कल संचलित मोहम्मदिया बॉईज उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स विद्यालयातील क्रीडा महोत्सव दरवर्षाप्रमाणे यावर्षी ही आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन शालेय प्रांगणात थाटामाटात करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन मा. इर्शाद भाई जहागीरदार(सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस, महा. राज्य)यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. रफिक अहमद अब्दुल मजीद होते. त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून मोहाडी पोलीस स्टेशनचे पीएसआय. मा.चेतन मुंडे साहेब, संस्थेचे खजिनदार *मा. इरफान अहमद अब्दुल खालिक, मा. मो.सुफी मो.शाबाना , मा. अब्दुल रशीद अब्दुल मजीद ,मा. मुस्तफा सेट (संचालक मंडळ :यंग बॉईज एज्युकेशनल अँड इंडस्ट्रियल सर्कल धुळे) मा. अन्सारी सव्वाल अमीन (माजी उपमहापौर म.न.पा. धुळे) मा. नवाब बेग मिर्झा,(माजी नगरसेवक म.न.पा. धुळे) मा. सलीम जैनुलब्दिन (संपादक सच्चा हत्यार) मा.रेहान शेख (संपादक बाणेदार लेखणी) मा.अनिस खाटीक (संपादक ,ग्रेट हिन्दुस्तान) मा. अब्दुल हाफिज अब्दुल हक (संपादक हमारे देश की समस्या) पेमा. तवाब अंसारी (संपादक जनसंग्राम) मा.निसार अहमद ,पप्पू आर्ट (सोनी वेब मीडिया) मा. सैफुर रहमान (संपादक श्रमकष्ट) मा.डॉ.सर्फराज अन्सारी (समाजसेवक, धुळे) मा.आबिद शेठ सांबर वाले ,मा, सरफराज भैय्या (समाजसेवक, धुळे ) श्रीमती रश्मी मिस व निलोफर मिस (प्रिन्सिपल इस्लामिक डे स्कूल) आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. रफिक अहमद अब्दुल मजीद ,रावसाहेब व मोहाडी पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. मा.चेतन मुंडे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करत खेळाचे महत्व सांगताना आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये मैदानी खेळाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने मुलांना आपले क्रीडा नैपुण्य दाखविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्यातील कौशल्य विकसित केले पाहिजे. कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचा स्वागत शाळेचे मुख्याध्यापक/ प्राचार्य मा.युनूस पटेल सर यांनी गुलाब पुष्प व शाल देऊन केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. डॉक्टर जावीद इकबाल सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे व्हावं म्हणून शाळेचे मुख्याध्यापक/ प्राचार्य मा. युनुस पटेल सर प्रभारी शिक्षक जाकीर शेख सर, जाहीद समद सर व क्रीडा शिक्षक मा. जमील कुरेशी सर तसेच जमीर शेख सर यांनी परिश्रम घेतले..