भारत जोडो न्याय यात्रा वरील हल्ल्याचा अमळनेर कांग्रेस तर्फे निषेध करत दिले निवेदन..

अमळनेर/प्रतिनिधि. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते व माजी राष्ट्रीय अध्यक्ष मा. राहुलजी गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा देशातील गोरगरीब, वंचित, महिला, विद्यार्थी, बेरोजगार तरुण, शेतकरी यांच्या न्याय हक्कासाठी दि. १४ जानेवारी २०२४ पासून मणिपूर येथून सुरुवात करुन नागालँड, अरुणाचल प्रदेश मार्ग आसाम राज्यात आली असताना यात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहून तेथील भाजपचे मुख्यमंत्री बिचरले व त्यांनी त्यांच्या भाजपच्या गुंडामार्फत यात्रेला अडथळा आणण्याचा प्रयत्न करुन यात्रेवर दगडफेक केली त्यात आसाम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भुपेन वोरा यांच्यासह असंख्य कार्यकर्ते जखमी झाले. तसेच मा. राहुल गांधी यांना यात्रेदरम्यान आसाम मधील मंदिरात जाण्यापासुन पोलीस प्रशासन यांनी मज्जाव केला.
अशा पध्दतीने भारत जोडो न्याय यात्रेचा आवाज बंद करु पाहणाऱ्या भाजपा सरकारचा निषेध करीत आहोत. तसेच यात्रेवर हल्ला करणाऱ्या गुंडांना त्वरित अटक करुन यात्रेला संरक्षण मिळण्याची मागणी करण्यात येत आहे. त्याबाबत आपण आपल्या स्तरावरून दिल्ली दरबारी पाठपुरावा करणे बाबत सुचित करण्यात येत आहे.असे निवेदन देण्यात आले या वेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.