पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे ‘नेताजी सुभाष चंद्र बोस’ यांची जयंती उत्साहात साजरी!

एरंडोल/कुंदन सिंह ठाकूर
दिनांक २३ जानेवारी थोर भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे महानायक , आझाद हिंद सेनेचे संस्थापक ,नेताजी सुभाष चंद्र बोस यांची १२७ वी जयंती जळगाव येथील पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी कु.राजवर्धन जाधव ह्याने नियोजित कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. कार्याक्रमची सुरुवात सकाळी ठीक ८:३० वाजता करण्यात आली. शाळेचे उप- प्राचार्य श्री दीपक भावसार यांच्या हस्ते श्री शारदा स्तवन आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या व नेताजींच्या प्रखर देशभक्तीचे वर्णन केले. कु.वसुंधरा माळी हीने आपल्या भाषणात सुभाषजींच्या जीवन कार्याविषयी माहिती देत त्यांना नेताजी हे नाव कसे मिळाले याबद्दल विद्यार्थ्यांना अवगत केले. त्यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेला उद्देशून “ तुम मुझे खून दो,मै तुम्हे आझादी दुंगा “ असे घोषवाक्य देवून देश कार्यासाठी समर्पित भावना देशभक्तांमध्ये जागृत केली. विद्यार्थ्यांनी ‘जय हिंद’ चा नारा देत देशभक्तांच्या महान कार्याला व समर्पणाच्या भावनेला उजाळा दिला. विद्यार्थ्यांनी प्रस्तुत केलेल्या लघुनाटिका आणि नृत्याविष्कारातून नेताजींच्या कर्तुत्वाला आदरांजली वाहिली. कु.क्षितीज पाटील ह्याने सुभाष चंद्र बोस यांची वेशभूषा साकारली. थोर नेत्यांचे कृती आणि शब्द हे भावी पिढीसाठी मार्गदर्शन व प्रेरणेचे अखंड स्त्रोत ठरले आहेत असे मत मांडले. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी महान देशभक्तांसाठी दर्शविलेल्या आदर व सन्मानाची भावना अधिक बळकट झाली. शाळेचे उप-मुख्याध्यापक दिपक भावसार, प्रशासकीय अधिकारी जितेंद्र कापडे, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमात प्रत्यक्ष उपस्थिती दर्शिविली होती.
शाळेच्या माध्यमिक विभागाच्या समन्वयिका सौ.मेघना राजकोटिया यांनी आभारप्रदर्शन केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.