चेन्नी रोड परिसरतील अतिक्रमनावर नगरपालिकेचा हतोडा…

दोंडाईचा प्रतिनिधी / रईस शेख
दोंडाईचा: शिंदखेडा तालुक्यात दोंडाईचा स्थानिक नगरपरिषद प्रशासनाने गुरुवारी (दि. २५) अतिक्रमण काढण्यात आला. या शहरातील चेन्नी रोड , बाजार पट्टा, यासह अन्य भागातील अतिक्रमण काढण्यात आले. अनुचित प्रकार घडू नये म्हणून कारवाईच्यावेळी पाेलीस बंदाेबस्त लावण्यात आला हाेता. शहरातील महत्त्वाच्या भागात काही नागरिकांनी राेडलगत वाहनतळ तयार करून माेठ्या प्रमाणात वाहने उभी करायला सुरुवात केली हाेती. काही दुकानदारांनी त्यांच्या दुकानांसमाेर शेडची निर्मिती केली हाेती. त्यामुळे शहरातील राेड अरुंद हाेऊन वाहतूक काेंडी व्हायची. याच वाहतूक काेंडीतून वाहन चालविताना तसेच पायी चालताना त्रास हाेत असल्याने अपघाताची शक्यताही बळावली हाेती. त्यामुळे हे अतिक्रमण काढण्याची मागणीही काहींनी स्थानिक पालिका प्रशासनाकडे केली हाेती. त्याअनुषंगाने पालिका प्रशासनाने शहरातील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेत अतिक्रमणधारकांना नाेटीस बजावून त्यांची अतिक्रमणे स्वत:हून काढण्याची सूचना केली. त्यासाठी त्यांना अवधीही देण्यात आला. हा अवधी संपल्यानंतर ज्यांनी अतिक्रमणे स्वत:हून काढली नाहीत, त्यांची अतिक्रमणे काढायला स्थानिक पालिका प्रशासनाने गुरुवारी सुरुवात केली आहे. दोंडाईचा शहरातील धुळे व शिंदखेडा मार्ग मोकळा करण्यात आला. यासह अन्य भागातील अतिक्रमणे काढण्यात आली. ही माेहीम पालिकेच्या मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी यांच्या नेतृत्वात राबविली जात असून, दोंडाईचा ठाणे सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाट व पाेलीस उपनिरीक्षक यांच्या नेतृत्वात पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता.
वाहनतळाची समस्या कायम
बहुतांश नागरिक त्यांची वाहने राेडलगत मिळेल तिथे उभी करतात. काही दुकानदार खाद्यपदार्थांची दुकाने व हातठेले राेडलगत थाटतात. त्यामुळे रहदारीस अडसर निर्माण हाेत असून, प्रसंगी भांडणेही हाेतात. अतिक्रमण त्यामुळे पालिका प्रशासनाने या छाेट्या दुकानदारांना त्यांच्या दुकानांसाठी तसेच नागरिकांना त्यांची वाहने उभी करण्यासाठी जागा उपलघ करून देणे गरजेचे आहे.