मराठा मोर्चाचा मुंबईतील मार्ग सुकर..
आंदोलनाला जागा उपलब्ध करून देण्याचे हायकोर्टाचे आदेश..

24 प्राईम न्यूज 25 Jan 2023. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर धरणे आंदोलन तसेच उपोषण करणाऱ्या मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यापासून रोखण्याची विनंती करणाऱ्या याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने कायदा आणि सुरक्षा व्यवस्था राखा. आंदोलनामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ शकणाऱ्या सार्वजनिक मार्गांनाअडथळा निर्माण होणार नाही यांची दक्षता घ्या. आंदोलकांना योग्य ती जागा उपलब्ध करून द्या, असे निर्देश राज्य सरकारला दिले. तसेच प्रतिवादी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान पोलीस स्टेशनला नोटीस बजावण्याचे निर्देश देत याचिकेची सुनावणी १४ फेब्रुवारीपर्यंत तहकूब ठेवली.
मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षण मिळावे, यासाठी साखळी उपोषण करण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यांच्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आदोलनाला काही हिंसक वळण लागले आहे. पंढरपूर येथे एक माळी समाजाच्या विकलांग तरूणीने आत्महत्या केली. सुरूवातीला ही आत्महत्या मराठा आदोलनाला समर्थन म्हणून भासविली गेली. मात्र त्या नंतर तो तरूण माळी समाजाचा असल्याचे उघड झाले. असे असताना ही आत्महत्या नाही तर मराठा समाजाच्या आंदोलकांनी केलेली हत्या आहे, असा दावा याचिकेत करताना या प्रकरणाचा सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश द्या. तसेच आदोलनकर्ते प्रमुख मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी याचिकेत केली आहे.