अखेर डॉ. उल्हास पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश..

24 प्राईम न्यूज 25 Jan 2023. कॉग्रेसमधून निलंबन केलेले काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी बुधवारी २४ जानेवारी रोजी मुंबईत आपली कन्या डॉ. केतकी पाटील आणि समर्थकांसह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी डॉ. केतकी पाटील यांची महिला प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली. भाजप प्रवेशामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत ते किंवा त्यांची कन्या डॉ. केतकी भाजपच्या तिकिटावर रावेर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. बुधवारी दुपारी मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी
भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळीडॉ. पाटील यांची कन्या डॉ. केतकी पाटील पत्नी डॉ. वर्षा पाटील, देवेंद्र मराठे यांचेसह त्यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.