“…तेव्हा काळजीवाहू ताई रस्त्यावर का उतरल्या नाहीत?”, अजित पवार गटाची सुप्रिया सुळेंवर बोचरी टीका

24 प्राईम न्यूज 25 Jan 2023
रोहित पवारांना ईडी चौकशीसाठी बोलावण्यानंतर सुप्रिया सुळेंनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली. यावरून अजित पवार गटाने सुप्रिया सुळेंना पलटवार केला आहे.राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते आमदार रोहित पवार यांना केंद्रीय सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी आज २४ जानेवारी रोजी बोलावले होते. यावरून राष्ट्रवादीने राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन केले. या आंदोलनात सुप्रिया सुळे यांचा महत्त्वाचा सहभाग होता. तसंच, सुप्रिया सुळे यांनी राज्य सरका आणि केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. यावरून अजित पवार गटाकडून प्रतिक्रिया आली आहे. अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे.आज रोहित पवारांच्या ईडी चौकशी विरोधात काळजीवाहू ताई रस्त्यावर उतरलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. मला हा प्रश्न पडतो की, जेव्हा आदरणीय अजितदादांवर इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई आणि चौकशा सुरू होत्या, त्यावेळेस अशा प्रकारचे मोर्चे का नाही काढले? किंवा अशा प्रकारे काळजीवाहू ताई रस्त्याव उतरल्या नाही? तुम्हाला दादांच्या पाठीशी उभे राहणं गरजेचे वाटले नाही का? असा सवाल रुपाली चाकणकर यांनी उपस्थित केला.