राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र सोशल मीडिया सचिव पदी मोईज अली सैय्यद यांची निवड

प्रतिनिधी/ अमळनेर
अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्ष प्रमुख अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनखाली प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली, महाराष्ट्र राज्य मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल भाईदास पाटील.महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस इर्शाद भाई जागिरदार.महाराष्ट्र प्रदेश सेल अध्यक्ष सुदर्शन जगदाळे ,यांच्या मान्यतेने
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र सोशल मीडिया सेलच्या सचिव पदी दिनांक २४/०१/२०२४ रोजी मोईज अली सय्यद यांची निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री. अजितदादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुरोगामी विचारधारा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण कार्य कराल अशी अपेक्षा नियुक्ती परिपत्रकात व्यक्त केली गेली.