तो पर्यंत शिक्षण मोफत द्या मनोज जरांगे पाटील यांची नवीन मागणी..

24 प्राईम न्यूज 27 Jan 2023
जोपर्यंत मराठा समाजाला सरकारी नोकन्या आणि शिक्षणात आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण आपले आंदोलन अर्धवट सोडणार नाही, असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी सांगितले. तसेच, संपूर्ण मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळेपर्यंत महाराष्ट्र सरकारने मोफत शिक्षण धोरणात सर्व मराठ्यांचा समावेश करण्यासाठी सुधारणा करावी, अशी नवी मागणी केली, तर आज रात्रीपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास ते आणि त्यांचे समर्थक शनिवारी आझाद मैदानावर आंदोलनासाठी मुंबईत दाखल होतील. मी एक पाऊल मागे घेत आहे. मी शुक्रवारपासून फक्त पाणी घेत आहे. तसेच आज रात्री विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी अध्यादेश काढला नाही, तर मी उद्या मुंबईत येईन, असा ही इशारा त्यांनी दिला.