जि. प. प्राथमिक केंद्रीय शाळा व कै. सुकलाल आनंद पाटील माध्यमिक विद्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त 400 विद्याथ्याना दुध वाटपाचा कार्यक्रम…

24 प्राईम न्यूज 27 Jan 2023

चिमनपुरी पिंपळे – जि. प. प्राथमिक केंद्रीय शाळा चिमनपुरी पिंपळे व कै. सुकलाल आनंद पाटील माध्यमिक विद्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम बारकू भगवान भिल व अशोक राजाराम पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला, ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे खु येथे सेवानिवृत्त मंडळ अधिकारी
डी आर पाटील, व ग्रामपंचायत पिंपळे बुद्रुक सौ दगुबाई भीमराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
तर पिंपळे येथे सेवानिवृत्त मंडळ अधिकारी डी. आर.पाटील यांच्या कडून विद्याथ्यांना दुध वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रामस्थ, पदाधिकारी, आजी-माजी सैनिक, आर्डी येथील पोलीस पाटील किरण वानखेडे, संगणक ऑपरेटर महेश कापडे व पंकज पाटील शिक्षक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते…
येथे विद्यार्थ्यांकडून तंबाखू मुक्त शपथ घेण्यात आले त्याप्रसंगी जि प प्राथमिक शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व नवोदयात जिल्ह्यामध्ये व तालुक्यामध्ये 1 नंबर आलेली रोशनी ज्ञानेश्वर पाटील विद्यार्थिनी ला ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले मराठी शाळेचे मुख्याध्यापक राजू पाटील, उपशिक्षक सुनील दौलत वाघ, इसाक मगण मावची ,पदवीधर शिक्षिका मीना अभिमान सोनवणे, वंदना भालचंद्र पाटील, दर्शना देवीदास पाटील ,वैशाली भाऊसाहेब देवरे, भारती पाटील,कै. सुकलाल आनंदा पाटील माध्यमिक विद्यालयाचे आदर्श मुख्याध्यापक नानासो.श्री अशोक देसले सर,ज्येष्ठ शिक्षक नानासो.श्री.जगदीश पाटील सर ,श्री चंद्रकांत पाटील सर, श्री.मधुकर निकम सर, श्री.गोपाल पाटील सर,श्री.राहुल पाटील सर,श्रीमती.शिरसाठ मॅडम, शिक्षकेत्तर कर्मचारी श्री.अशोक मोरे,अंकुश पाटील अहिरे भाऊसाहेब केद्र प्रमुख रवींद्र पाटील व ग्रामपंचायत सरपंच वर्षा युवराज पाटील माजी सरपंच योगेश अशोक पाटील उपसरपंच शोभाबाई गोकुळ पाटील ,सदस्य अरुण संभाजी पाटील , संतोष बापू चौधरी , कल्पना साहेबराव पाटील, मिनाबाई सतीश पाटील, जयश्री सुदाम पाटील व महिला बचत गटाचे अध्यक्ष स्वाती पाटील व अंगणवाडी सेविका ,आशा सेविका , ग्रामसेवक किरण लंकेश,ग्रामपंचायत शिपाई ज्ञानेश्वर पाटील,रोजगार सेवक संतोष पाटील, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील सर्व ग्रामस्थ माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते