कुणबी दाखले स्थगित करा-भुजबळ अधिसूचने
विरोधात ओबीसी नेते आक्रमक..

0

24 प्राईम न्यूज 29 Jan 2023. मराठा आरक्षणासंबंधी राज्य सरकारने जारी केलेल्या नव्या अधिसूचनेविरोधात ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. रविवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या सिद्धगड शासकीय निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत ओबीसी नेत्यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे समजत आहे या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, ओबीसी नेत्यांच्या बैठकीत सरकारच्या निर्णयावर दुःख आणि संताप व्यक्त करण्यात आला. सरकारने मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अधिसूचनेतील सगेसोयरे संदर्भातील मसुदा रद्द करण्यात यावा, निवृत्त न्या. शिंदे समिती असंवैधानिक असल्याने ही समिती आणि राज्य मागासवर्गीय आयोग बरखास्त करण्यात यावा, कुणबी प्रमाणपत्राला स्थगित देण्यात यावी हे तीन ठराव संमत करण्यात आले आहेत. या अधिसूचनेवर १६ फेब्रुवारीपर्यंत आम्ही लाखोंनी हरकती दाखल करणार असून ३ फेब्रुवारी रोजी नगरला ओबीसी मेळावा आयोजित केला असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. या बैठकीला मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री राम शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार नारायण मुंडे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ यांच्यासह विविध संघटना आणि समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!