साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये पारंपारिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन..

अमळनेर /प्रतिनिधि साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमा अंतर्गत मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे व आर.एम.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपारिक क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.
व्यासपीठावर संस्थेचे जेष्ठ संचालक गुणवंतराव गुलाबराव पाटील हे अध्यक्षस्थानी होते. तसेच शालेय समिती अध्यक्ष प्रा.डॉ.एस.जे.शेख, सदस्य भास्कर बोरसे, किरण पाटील, अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्रीमती बोरसे मॅडम म्हणाल्या की पारंपारिक खेळ लुप्त होत आहेत, त्याकडे आजच्या विद्यार्थिनींचे दुर्लक्ष होत आहे. त्या खेळांकडे विद्यार्थिनींना कसे वळवता येईल व त्यांचा शारीरिक व मानसिक बौद्धिक विकास कसा करता येईल तो प्रयत्न आम्ही पारंपारिक खेळ घेऊन करणार आहोत. आपल्या भाषणात डॉ.शेख सर म्हणाले आजचे विद्यार्थी मैदानावर खेळत नाही म्हणून त्यांना जास्त वेळ बौद्धिक श्रम करता येत नाही. म्हणून तुम्ही रोज एक तास खेळा व मेहनत करा क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन माता – पालक सदस्य सौ.भारती सोनवणे यांनी केले. त्यांच्यासोबत माता-पालक सदस्य सौ. योगिता ढोले व सौ.गायत्री पाटील उपस्थित होत्या.
विटी दांडू स्पर्धेचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष गुणवंतराव पाटील व भास्कर बोरसे यांनी विटी दांडू खेळून केले. लंगडी स्पर्धेचे उद्घाटन सर्व मान्यवरांनी लंगडी घालून केले. सागर गोट्या स्पर्धेचे उद्घाटन संदीप घोरपडे यांनी सागर – गोट्या खेळून केले तर फुगडी स्पर्धेचे उद्घाटन पालक संघ सदस्य सौ.भारती सोनवणे, सौ.योगिता ढोले, सौ.गायत्री पाटील, मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे, उपशिक्षिका सौ.मनिषा वैद्य.सौ.मोनाली वंजारी, श्रीमती धनश्री वानखेडे, क्रीडा शिक्षक आर.एम.देशमुख, दीपक महाजन यांनी फुगडी घालून केले. सोबत या खेळाचे पारंपारिक महत्त्व सांगितले. सूत्रसंचलन आर.एम.देशमुख व आभार मुकेश पाटील यांनी मानले.