ईस्माईल दगू जनसेवा
फाऊंडेशन दिनदर्शिकेचे प्रकाशन…

नंदुरबार /प्रतिनिधि. नंदूरबार येथील इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) प्रदेश सरचिटणीस इरशादभाई जहागीरदार यांच्या हस्ते धुळे येथे करण्यात आले.
यावेळी इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान, धुळे बागवान समाजाचे अध्यक्ष हाजी सलीम बागवान, युवाध्यक्ष शकील वजीर बागवान, संस्थेचे सचिव दानिश बागवान, सैय्यद शोएब, सामजिक कार्यकर्ते जमील कुरेशी, इद्रिश बागवान, असलम अखतर, हाजी सिद्दीक बागवान, युनुस हाजी शफी, शकील रसुल बागवान, हाजी मुख्तार पहेलवान, आसिफ शाह, इद्रीश जुम्मा आदी उपस्थित होते. इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशन ही संस्था सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात सेवाभाव करणारी स्वयंसेवी संस्था आहे. संस्थेच्यावतीने अन्नदान, रक्तदान, सामुदायिक विवाह सोहळा, पाणपोई, महापुरुषांची जयंती-पुण्यतिथी असे विविध उपक्रम राबविले जातात. संस्थेतर्फे सन २०२४ ची दिनदर्शिका बनविण्यात आली. या दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.