अमळनेरातील अट्टल गुन्हेगार रमणवर एमपीडीए कारवाई..

अमळनेर /प्रतिनिधि अमळनेर स्टेशन रोड लगत राहणाऱ्या रमण उर्फ माकु बापू नामदास (वय २२) याला २९ रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास अटक करुन एमपीडीए अंतर्गत कारवाईकरण्यात आली. त्याला कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
रमणच्या विरुद्ध अमळनेर स्टेशनला जबरी चोरी, चाकुचा धाक दाखविणे, साहित्य चोरी करणे असे ५ गुन्हे दाखल होते. त्यांच्यावर कारवाईदेखील प्रतिबंधात्मक करण्यात आली होती, मात्र त्याच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती. शेवटी पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यानंतर डीवायएसपीसुनील नंदवाडकर तसेच पोलिस निरीक्षक विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाने रमणला २९ रोजी रात्री पोलिस उपनिरीक्षकभगवान शिरसाठ च अमलदारांनी अटक केली. त्याची कोल्हापूरच्या कारागृहात रवानगी केली आहे..