लोकशाहीचा आवाज दाबला जातोय – रोहित पवार
ईडीकडून दुसऱ्यांदा ८ तास चौकशी..

24 प्राईम न्यूज 2 फेब्रु 2023. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची ईडीने गुरुवारी दुसऱ्यांदा चौकशी केली. दुपारी १ वाजता ईडीच्या बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात हजर झालेले रोहित पवार चौकशीनंतर ८ तासांनी रात्री ९ वाजता ईडीच्या कार्यालयाबाहेर आले. यावेळी ईडी कार्यालयाबाहेर जमलेल्या कार्यकत्यांशी संवाद साधताना लोकशाहीचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलायाआधी रोहित पवार यांची २४ डिसेंबरला ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. सुमारे ११ तासांच्या चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आले होते. त्यानंतर त्यांना १ फेब्रुवारीला पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने क्लोजर रिपोर्ट सादर करूनही चौकशी सुरू असल्याने ईडी अधिकाऱ्यांच्या कारवाईवर कार्यकर्त्यांकडून संशय व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेसह ईडीकडे २ स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. याच घोटाळ्यासंदर्भात रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीसह ५ कंपन्या, घर व कार्यालयावर ईडीने छापे टाकले होते. या छाप्यात घोटाळ्यासंदर्भातील काही दस्तावेज ताब्यात घेण्यात आले होते. महाराष्ट्र सहकारी क्षेत्रातील साखर कारखाने कथित फसव्या मार्गाने आणि कवडीमोल भावाने विक्रीचा त्यांच्यावर आरोप आहे.