विवेकानंद केंद्रातर्फे रविवारी रक्तदान शिबिर..

एरंडोल(प्रतिनिधि) कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राच्या एरंडोल शाखा व जळगाव शाखे तर्फे श्री. माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढीच्या विद्यमाने रविवारी रक्तदान शिबीर.
एरंडोल – येथे रविवारी आर टी काबरे शाळेच्या आवारात सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाचपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले आहे. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास विवेक शलाका २०२३ ही डायरी भेट म्हणून दिली जाणार आहे. रक्ताची अनेक गरजूंना आवश्यकता असते. रक्तदानामुळे केवळ लोकांचे प्राण वाचतातच असे नाही तर जो रक्तदान करतो, त्याचे आरोग्य सदृढ राहते. त्यामुळे रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन विवेकानंद एरंडोल केंद्रातर्फे करण्यात आले आहे.