स्वराज्य सप्ताह च्या अनुषगाने छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा आज दुग्ध अभिषेक..

अमळनेर प्रतिनिधी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने १२ ते १८ या तारखे मध्ये स्वराज्य सप्ताह यांचे आयोजन करण्यात आले आहे, त्या अनुषंगाने अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या येत्या १९ फेब्रुवारी जन्मोत्सवाच्या निमित्ताने आज अमळनेर तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा आज दुग्ध अभिषेक शिवाजी बगीचा येथे करण्यात आला.
त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुरेश पाटील, तालुका कार्याध्यक्ष सुनील काटे, तालुका कार्याध्यक्ष रामराव पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, शहर कार्याध्यक्ष विनोद कदम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भोजमल पाटील, नगरसेवक विवेक पाटील, शहर युवकाध्यक्ष पंकज साळी, महेंद्र बोरसे, इम्रान खाटीक, प्रकाश माळी, भूषण पाटील, गणेश पाटील, यतीन पवार, निलेश देशमुख, आबीदअली सय्यद, आरिफ पठाण, वसीम पठाण, सुलतान खाटीक, सत्तार खाटीक, कलीम शेख, पप्पू खराटे, मुस्ताक बागवान, इमो शेख, बबलू खाटीक, हर्षद खाटीक, अहमद सय्यद, सोनू मोरे आदी हिंदू-मुस्लिम समाजातील नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते!