राष्ट्रवादी युवक कांग्रेस च्या शहर उपाध्यक्ष सह शेकड़ो कार्यकर्ते व महिलांचा AIMIM मध्ये जाहीर प्रवेश..

नंदुरबार /प्रतिनिधि स्वतःला धर्मनिर्पेक्ष, सेकुलर पक्ष व नेते म्हणत सेकुलर हिंदू, मुस्लीम, दलित आदिवासी व ओबीसिंची मते घेणारे अनेक पक्ष व पक्ष श्रेष्ठीं आपल्याच पक्षाची घटना व ध्येय धोरणांशी एकनिष्ठ राहिले नाही, कोणीही कधीही कोणत्याही पक्षात उडी

मारून कुठेही निघुन जात असल्याने मागील काही महिन्यापासून राजकीय वातावरण कमालीचे बदलत चालले आहे. सामान्य जनतेला मूर्ख समजुन कार्यकर्तांनाही आपल्या फायदासाठी वापरुण घेणेसाठी स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणणारे मोठमोठ्या पक्षांची हकीकत सर्वसामान्य जनतेसमोर येत आहे. जे लोक AIMIM व असदुद्दीन ओवैसी साहेबांना बीजेपीचे एजेंट व बी टीम म्हणत होते ते सर्व तथाकथित सेकुलर नेते आपल्या भरवश्यावर आपला झेंडा हाती घेऊन मिरवणारे कार्यकर्ते, पदाधिकारी व जनसामान्यांना वाऱ्यावर सोडुन धडाधड बीजेपी मध्ये सामिल झाले व होत आहे. आजपर्यंत धर्मनिर्पेक्षतेच्या नावावार या सर्व पक्षांना डोळे बंद करून मतदान करणारे व यांना सत्तेच्या खुर्चीवर बसवणारे सामान्य लोकांना हे नेते मुर्ख समजत आले. पण अता लोकांना समजले आहे की या देशात फक्त एकच पक्ष असा आहे की जे सर्वसामान्यांवर केले जाणारे राजकीय अन्याय अत्याचार च्या विरोधात गल्ली पासून दिल्ली पर्यंत आवाज बुलंद करू शकतो व न्याय मिळवून देणेकरीता अहोरात्र धावपळ करतो. तो पक्ष फक्त AIMIM आहे, अशी भावना घेऊन उत्तर महाराष्ट्र कार्य अध्यक्ष सैय्यद रफअत हुसैन यांच्या प्रमुख उपस्थितित नंदुरबार शहरात आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या शहर उपाध्यक्षसह इतर पक्षांचे सुमारे शंभरहून अधिक कार्यकर्ते व मोठ्या संख्येत महिलांनी AIMIM पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी पक्षाचे शहर कार्याध्यक्ष अरशद अली यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच सैय्यद रफअत हुसैन यांनी आपले अध्यक्षीय भाषणात पक्षाचे ध्येय धोरण व ओवैसी साहेबांचे विचार की राजकारणात भाग घ्या, स्वतः नेते व्हा, लोकशाहीला बळकट बनवा, हे सर्वांसमोर ठेवले. यावेळी पक्षाचे वाढतूक सेल शहराध्यक्ष मिर्जा मुख्तार बेग, विध्यार्थी आघाडीचे हाफिज अब्दाल पठान, युवाचे सलमान शेख, ओबीसीचे शरीफ बागवान, भाखेचे इरफान कुरेशी, इम्तियाज कुरेशी, जुबेर रफीक शेख, अरबाज शाह, सलमान कुरेशी, तबरेज सैय्यद, शकील हलवाई, तैय्यब खाटिक आदी मान्यवर सदर प्रभागातील हिंदू मुस्लीम, दलित व आदिवासी बांधव हे मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समीर शेख व त्येंचे सहकारींनी मेहनत घेतली.