इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनतर्फेछत्रपती शिवरायांना अभिवादन..

0


नंदुरबार /प्रतिनिधी. येथील इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशन व सदा जनसेवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रयतेचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष रवींद्र परदेशी, फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून निशाद पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रताप सोनवणे, नॅशनल ह्युमेन राईट ऑफ इंडीयाचे अध्यक्ष डॉ.एम.ए.खान, माजी नगरसेवक तैय्याबा फाऊंडेशनचे अध्यक्ष फरीद शेख गुलाम रसुल, माजी नगरसेवक मोहन श्रॉफ, ऍड.विक्रमसिंग रघुवंशी, उत्सव समितीचे अध्यक्ष सैय्यद मुख्तार, उपाध्यक्ष नासिर बागवान, सामाजिक कार्यकर्ते संग्राम ठाकूर, फाउंडेशनचे सचिव दानिश बागवान आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुर्ष्पापण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी रविंद्र परदेशी म्हणाले की, हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देत मोठ्या उत्साहात व आनंदात शिवजयंती कार्यक्रम संस्थेतर्फे घेण्यात आला. याबद्दल त्यांनी संस्थेचे कौतुक केले. या संस्थेतर्फे वर्षभर विविध कार्यक्रम राबविले जातात. त्यात गरीबांसाठी सामुहिक विवाह, अन्नदान, रक्तदान, पाणपोई, महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी अनेक विविध कार्यक्रम राबविले जातात. सूत्रसंचालन संस्थेचे संचालक रिजवान बागवान यांनी केले. तर आभार जमीन खाटीक यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!