आयपीएल भारतातच 22 मार्च पासून.

0

24 प्राईम न्यूज 21 Feb 2024. इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या यंदाच्या मोसमाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. देशात सार्वत्रिक निवडणुका असूनही आयपीएल भारताबाहेर जाणार नसल्याचे लीगचे चेअरमन अरुण धुमल यांनी मंगळवारी स्पष्ट केले. निवडणुका एप्रिल आणि मे महिन्यात होण्याची शक्यता आहे.

धुमल म्हणाले, ‘पहिल्या पंधरा दिवसांचे वेळापत्रक सध्या जाहीर झाले आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर स्पर्धेचे उर्वरित वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.’ निवडणुकीच्या तारखा पुढील महिन्याच्या सुरुवातीस जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. धुमल म्हणाले, ‘आम्ही २२ मार्चला स्पर्धा सुरू करणार आहोत. सरकारी संस्थाशी या संदर्भात आमचे बोलणे सुरू आहे. सध्या तरी आम्ही प्राथमिक वेळापत्रक जाहीर करीत आहोत. अर्थात, संपूर्ण स्पर्धा भारतातच होईल.’ निवडणुकांमुळे २००९मध्ये आयपीए स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळली गेली होती, तर २०१४च्या निवडणुकांमध्ये आयपीएलचा पहिला टप्पा संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) पार पडला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!