एरंडोल महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची पोलीस स्टेशनला क्षेत्रभेट..

एरंडोल(प्रतिनिधि) येथील महाविद्यालयातील आत्मनिर्भर युवती अभियानांतर्गत विद्यार्थिनींनी एरंडोल पोलीस स्टेशनला भेट दिली. यावेळी विद्यार्थिनींनी पोलीस स्टेशनच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली.
त्यामुळे मुलींच्या मनातील भीती दूर झाली. तक्रार नोंदविताना कोणती खबरदारी घ्यावी पोलीस विभाग सर्वसामान्य जनतेच्या संरक्षणासाठी कोणकोणती कामे करतो याची माहिती मिळावी. या उद्देशाने क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले
पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी मुलींच्या मनामध्ये असलेल्या शंकांचे निरसन केले. तसेच त्यांना मिळालेले स्टार कशासाठी आहेत याविषयी सविस्तर.उहापोह करण्यात आला
महिला अटक करण्यासाठी कोणकोणते नियम व कायदे आहेत याविषयीची माहिती देण्यात आली.
यावेळी मिलिंद कुमावत, संदीप पाटील, अनिल पाटील, राजेश पाटील, यांनी सहकार्य केले. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर स्वाती शेलार डॉक्टर हेमंत पाटील डॉक्टर रेखा साळुंखे डॉक्टर शर्मिला गाडगे डॉक्टर सविता पाटील डॉक्टर मीना काळे यांनी परिश्रम घेतले.