डुकरे व कुत्रे यांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त..

एरंडोल(प्रतिनिधि) येथे डुकरे व कुत्रे यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. कोणत्याही गल्लीत, किंवा कोणत्याही रस्त्यावर, बोळात, जर डुकरे व कुत्रे दिसले नाहीत तर एक हजार रुपये मिळवा. असे उपरोधाने नागरिकांमध्ये बोलले जाते. डुकरे व कुत्रे यांच्या उपद्रवामुळे नागरिकांना मोठी डोकेदुखी झाली आहे
विशेष हे की शहरालगतच्या शेतांमध्ये डुकरे पिकांची नासाडी करीत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. तसेच डुकरांची शिकार करण्यासाठी कुत्र्यांचे कडप ठिकठिकाणी सावज हेरतांना दिसून येतात. नगरपालिका प्रशासनाने विकास कामे व विकास योजनांच्या अंमलबजावणी बरोबर शहरवासीयांना होणाऱ्या त्रासापासून करावे डुकरांचा व कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्यासाठी मोहीम हाती घ्यावी अशी जाणकारांची मागणी आहे.