नाही उड्डाणपूल किमान आम्हाला समांतर रस्ते तर द्या,
एरंडोलकरांची मागणी….

एरंडोल(कुंदन सिंह ठाकुर) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाच्या कामात पोरोळ्याला चौपदरीकरणाच्या कामाच्या नकाशात उड्डाणपूल देण्यात आला आहे. मात्र एरंडोल त्याला अपवाद असल्यामुळे आम्हाला नका उड्डाणपूल द्या किमान नंदगाव फाट्यापासून बस स्थानकाच्या प्रवेशद्वारापर्यंत महामार्गाच्या दुतर्फा समांतर रस्ते दिलेच पाहिजे अशी आग्रही मागणी एरंडोल वाशीय पुन्हा पुन्हा करीत आहेत तसेच नंदगाव फाटा, अमळनेर नाका, हिमालय पेट्रोल पंप, पिंपरी फाटा या ठिकाणी जंक्शन देणे नितांत गरजेचे आहे तसेच या परिसरात गटारींसह इतर सुविधा पुरविणे आवश्यक आहे.
या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर या परिसरात अपघातांचे प्रमाण वाढूवन निष्पाप लोकांचे बळी जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
वराड तालुका धरणगाव, पाळधी तालुका धरणगाव या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात समांतर रस्ते व महामार्गाच्या दोन्ही बाजूंना गटारी बांधण्यात आलेल्या आहेत असे असताना एरंडोल या तालुक्याच्या गावाला न्याय का मिळत नाही. याबाबत प्रचंड नाराजी पसरली आहे
दरम्यान एरंडोलकर शांत संयमी व शोषित आहेत ् मात्र जर अन्याय झाला तर तो ही सहन करणार नाही. अशी या शहराची परंपरा आहे. एरंडोल करांच्या सहनशीलतेचा महामार्ग प्राधिकरणाने अंत पाहू नये. असा सूर उमटत आहे. जर चौपदरीकरणाच्या कामात उपरोक्त चार-पाच ठिकाणी जंक्शन, महामार्गाच्या दोन्ही बाजूला समांतर रस्ते गटारींसह दिले नाही तर एरंडोलकरांच्या दृष्टीने हायवे हा भविष्यात हेवन वे ठरू शकतो.