वंचितचा मार्ग वेगळासात उमेदवारांची नावे जाहीर; जरांगेंबरोबर ‘सामाजिक युती’ असल्याची आंबेडकर यांची घोषणा.


24 प्राईम न्यूज 28 Mar 2024. वंचित बहुजन आघाडीने मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सामाजिक युती केली असून या माध्यमातून नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. बुधवारी अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘मविआ’ मध्ये सहभागावरून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतानाच
वंचित आघाडीने बुधवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. आंबेडकर म्हणाले, वंचितची राज्य कार्यकारिणीची बैठक मंगळवारी रात्री झाली. माझ्यासह वंचितच्या नेत्यांसोबत मनोज जरांगे पाटील यांची चर्चा झाली. या चर्चेमध्ये काही मुद्दयांवर आमचे एकमत झाले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, कृषी उद्योगांना प्राधान्य व इतर मुद्यांवर चर्चा करण्यात आली. लोकसभेमध्ये ओबीसी समूहाला एक किंवा दोन टक्के प्रतिनिधित्व दिले जाते. हे चित्र बदलण्याचा आमचा प्रयत्न आहे.
