अमरावतीतून नवनीत राणा भाजपच्या अधिकृत उमेदवार.

24 प्राईम न्यूज 28 Mar 2024

भाजपने बुधवारी लोकसभा उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली. या यादीत भाजपने नवनीत राणा यांना अमरावती मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ नवनीत राणा यांच्या उमेद्वारीला तीव्र विरोध करीत आहेत. राजकारण सोडावे लागले तरी चालेल, पण मी नवनीत राणांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका अडसूळ यांनी घेतली आहे, तर दुसरीकडे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनीसुद्धा राणांच्या उमेदवारीला विरोध के केला आहे. त्यातच राणा यांच्या बोगस जात प्रमाणपत्राच्या खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवलाआहे. असे असूनही भाजपने त्यांची उमेदवारीजाहीर केल्याने महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे म्हटले जात आहे.
