प्रेमसंबंध तोडल्याने तरुणीला प्रियकराची फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विनयभंग..


अमळनेर/ प्रतिनिधी. प्रियकर व्यसनाधीन झाल्याने त्याला नकार दिला म्हणून तिला फोटो व्हायरल करण्याची – धमकी देऊन विनयभंग करणाऱ्या – एरंडोल तालुक्यातील विखरण येथील – प्रियकरावर अमळनेर येथे गुन्हा दाखल – करण्यात आला आहे.दीपक कैलास महाजन (विखरण, ता. एरंडोल, ह. मु. सावतावाडी बहादरपूर) याचे शहरातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र दीपक व्यसनाधीन असल्याचे समजल्यावर तरुणीने त्याच्याशी प्रेमसंबंध तोडले होते. दीपकने ११ मार्च रोजी दुपारी १२ वाजता तरुणीचा पाठलाग करून तिला – शिवीगाळ केली होती.
त्यानंतर पुन्हा २५ मार्च रोजी दुपारी = २ वाजता तिच्या घरासमोर जाऊन – तिचा विनयभंग केला. तसेच फोटो – व्हायरल करण्याची धमकी दिली.म्हणून पीडित तरुणीने अमळनेर – पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून तरुणाविरुद्ध विनयभंग, दमदाटीचा – गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोउनि नामदेव बोरकर करीत आहेत.
