पण जिंकला तो कृष्णच सुनेत्रा पवारांचे प्रत्युत्तर.


24 प्राईम न्यूज 27 Mar 2024. पुणे । राष्ट्रवादी मधील फुटीपासून शरद पवार गटाकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सातत्याने पक्ष चोरल्याची टीका होते. अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांनीही अजितदादांना साथ देणार नाही, असे म्हटले होते. बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना रंगत असताना पवार कुटुंबीयांचा पाठिंबा शरद पवार गटाला मिळताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार मंगळवारी भोर वेल्हे मुळशी विधानसभा मतदारसंघाला भेट दिल्यानंतर सोशल मीडियातून आपल्या भावना व्यक्त केल्या. महायुतीतील इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यानीदेखील विकासकामांबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पक्षीय राजकारणापलीकडचे व्यापक हिताचे अनुभव सांगितले. जनतेला २४ तास भेटणारे दादा आहेत. कधीही फोन केला तर त्याला प्रतिसाद देणारे दादा आहेत. आपण सारे जण दादांचे भाऊ आहोत. श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण महाभारतात जिंकला तो कृष्णच. अशा अनेक भावना सर्वांकडून पोटतिडकीने व्यक्त होताना बारामतीत दिसत आहे.
