२५ हजाराची लाच स्वीकारताना निम येथील ग्रामसेवक अडकला जाळ्यात… ए सी बी चे शशीकांत पाटील यांची कार्यवाही…

अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर तालुक्यातील नीम येथे वीट भट्टी चालवण्यासाठी एकाने महसूल विभागाकडे ६ हजार रुपये रॉयल्टी भरली होती. तरी सुद्धा ग्रामपंचायतीचा नाहरकत दाखला लागेल व त्यासाठी २७ हजार ५०० रुपयांची लाच ग्रामसेवक राजेंद्र लक्ष्मण पाटील यांनी मागितली तक्रारदाराने जळगाव येथे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानन्तर २३ रोजी दुपारी डीवायएसपी शशिकांत पाटील ,पोलीस निरीक्षक एन एन जाधव , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील ,सुरेश पाटील , हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील , रवींद्र घुगे , शैला धनगर , जनार्दन चौधरी ,किशोर महाजन , बाळू मराठे ,सुनील वानखेडे , महेश सोमवंशी , राकेश दुसाने , प्रणेश ठाकूर ,अमोल सुर्यवंशी यांनी सापळा रचून २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.