देशात शांतता आणि बंधुभाव नांदावी, अशी प्रार्थना करत आज ईद उल फितरची नमाज इदगाह मैदानावर अदा…


अमळनेर/प्रतिनिधी. देशात शांतता आणि बंधुभाव नांदावी, अशी प्रार्थना करत आज ईद उल फितरची नमाज इदगाह मैदानावर अदा करण्यात आली.यावेळी हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली.काल संध्याकाळी ईदचा चांद दिसल्यानंतर आज सकाळी 8 वाजता ईदला सुरुवात झाली.8 : 15 मिंटानी गांधीपुरा येथील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी मौलाना नौशाद आलम यांच्या मागे नमाज अदा केली.नमाजानंतर सर्वांनी हात वर करून अल्लाहकडे प्रार्थना करण्यात आली की आपल्या भारत देशात शांतता आणि बंधुभाव नांदावी. या देशात सदैव शांतता आणि बंधुभाव नांदो, नमाज अदा केल्यानंतर सर्वांनी एकमेकांना मिठी मारून शुभेच्छा दिल्या, मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, डीवाय एसपी सुनील नांदवलकर पीआय विकास देवरे यांनी ईदगाह मैदानावर ईदच्या शुभेच्छा दिल्या. डॉ.अनिल शिंदे,संदीप घोरपडे,आदी उपस्थित होते.नमाज अदा केल्यानंतर सर्वांनी स्मशानात जाऊन आपापल्या पूर्वजांसाठी प्रार्थना केली.सर्व परिसरात लहान मुले एकमेकांना शुभेच्छा देताना दिसली संपूर्ण शहरात आनंदाचे वातावरण होते, शहरात हिंदू-मुस्लिम ऐक्य दिसून आले, सर्व बांधवांनी शिरखुरमेचा आस्वाद घेतला.
