रनाळे येथे दर्गाची विटंबना गावात तणावपूर्वक शांतता.

नंदुरबार/ प्रतिनिधि

रनाळे येथील शनिमांडळ रस्त्यालगत इंदिरानगर मध्ये हजरत गैबानशहा बाबा दर्गा असुन सदर दर्गा हिंदू मुस्लिम एकीचे प्रतीक मानली जाते रमजान ईदच्या आदल्या रात्री अज्ञात समाज कंटकांकळून कडून समाधी स्थळ (तूरबत) ची तोडफोड करण्यात आली दर्गा मधील समाधी स्थळाची तोडफोड झाली असल्याचे सकाळी सहा वाजता निदर्शनात आले. गावातील सर्वच मुस्लिम समाज दर्ग्याच्या दिशेने धावले व दरग्याची विटंबना झाल्याचे बघुन सर्व ग्रामवासी एकवटले पोलीस प्रशासनाला माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रवन दत्त. एस, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, एलसीबी चे खेळकर, पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्यासह फौज फाटा मोठ्या संख्येने घटनास्थळी हजर झाले व शांततेचे आवाहन करत उपस्थितांना रमजान ईदची नमाज पठण करण्याची विनंती केली. मुस्लिम समाजाच्या वतीने आरोपींना लवकरात लवकर पकडण्यात यावे त्यानंतरच ईदची नमाज अदा केली जाईल अशी मागणी करण्यात आली.
सकाळी साडेआठ वाजता होणारी ईद ची नमाज साडेदहा वाजता ईदगाह ऐवजी मशिदीत पठाण करण्यात आली.
जिल्हाभरात ईदनिमित्त पोलिस बंदोबस्त लावले असतांना स्वतः पोलिस अधीक्षक दत्त हे स्वतः घटनास्थळी सुमारे दोन तास तळ ठोकून होते, तपासाची यंत्रे शीताफिने फिरवत आठ ते दहा समाज कंटकांना ताब्यात घेतले असल्याचे समजते.
सदर दरग्याला त्वरीत रिपेअर करून पुन्हा संदल व इतर धार्मिक विधी करण्यात आली आहे.
ऐन ईदच्या वेळी समाजविघातक कृत्य करण्यामागे समाज कंटकांचे उद्देश्य काय? या षडयंत्रामागे अजुन कोण कोण आहे हे समोर येणे गरजेचे असुन पोलिस अधीक्षकांच्या तत्परतेने मोठे अनर्थ टळले आहे.
