मृत व्यक्तीच्या रक्षेचे विसर्जन-जल व पर्यावरण रक्षण आंबा ऋषी टेकडी ग्रुपचा नवीन उपक्रम..

अमळनेर /प्रतिनिधी

अमळनेर शहरातील केशवनगर मधील दीपक आधार चौधरी (एसटी कंडक्टर), हरीश चौधरी, गिरीश चौधरी,यांनी आपल्या वडिलांच्या रक्षा विसर्जन न करता त्या रक्षेचा उपयोग त्यांच्या नावाने टेकडीवर वडाचे रोप लावून करण्यात आला त्या माध्यमातून त्यांची स्मृती भविष्यात टिकून राहील टेकडी ग्रुपचे अध्यक्ष आशिष चौधरी यांनी सांगितले की माझ्या आजोबांचे स्मरण आता कायम आमच्या स्मरणात राहील याप्रसंगी त्यांच्या मुलाने टेकडी ग्रुपला 1001 रुपये देणगी दिली आहे याप्रसंगी मा. प्रा. डॉ.एस .आर .चौधरी, शांतीलाल चौधरी , रवींद्र पाटील व मृताचे नातेवाईक तसेच डॉ. अनिल वाणी, सुरेश भावसार, नरेश कांबळे व अन्य टेकडी ग्रुप सदस्य उपस्थित होते आपल्या मृत नातेवाईकांची रक्षा सामान्यपणे नदीत किंवा एखाद्या जलाशयात विसर्जित केली जाते त्यामुळे पाण्याचे प्रदूषण होते रक्षेचा उपयोग झाड लावण्यासाठी केल्यास प्रदूषण थांबण्यास मदत होईल तसेच रक्षेचे पवित्रही राहील येणाऱ्या काळात हे जंगल आपल्याला स्मृतीवन म्हणूनही परिचित होईल या उपक्रमाद्वारे टेकडी ग्रुपचे सदस्यांनी शहरातील लोकांना नवीन उपक्रमासाठी अशा माध्यमातून आव्हान केले आहे आपले मृत नातेवाईकांची रक्षा इकडे तिकडे किंवा जलाशयात न टाकता टेकडीवर आणून त्या व्यक्तीच्या स्मृती प्रित्यर्थ एक झाड लावू शकता टेकडी ग्रुप आपणास सहकार्य करेल असे आव्हान सदस्यांनी केले आहे