नाईलाजाने निर्णय घेण्याची वेळएकनाथ खडसेंवर शरद पवारांचे स्पष्टीकरण..

0

24 प्राईम न्यूज 22 Apr 2024. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. दोन वर्षांपूर्वी खडसेंनी भाजपातील अंतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र आता खडसे पुन्हा भाजपात प्रवेश करणार असून त्यांनी याबाबत स्वतः माहिती दिली आहे. विशेष म्हणजे एकनाथ खडसेंच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘एकनाथ खडसे यांच्यावर नाईलाजाने निर्णय घेण्याची वेळ आली असावी, असे शरद पवार म्हणाले.

जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबच्या भूमिकेवर भाष्य केले. ते म्हणालेकी, राज्यात याआधी कधीच कोणावर व्यक्तिगत टीका केली जात नव्हती. पण सध्या व्यक्तिगत टीका केली जात आहे. या टीकांमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो. कदाचित ही वेळ एकनाथ खडसे यांच्यावर आली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर नाईलाजाने काही निर्णय घेण्याची वेळ आली असावी. असा माझा समज आहे. एकनाथ खडसे यांच्यावर तपास यंत्रणांचा दबाव आहे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

याशिवाय, एकनाथ खडसे भाजपात प्रवेश करत असतील तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे का? असा सवाल विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, मला याबाबत माहिती नाही. जयंत पाटील यांना माहीत असेल. ते संघटनेचे काम पाहतात, असे शरद पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!