चारचाकीने दुचाकीला धडक दिल्याने एक जखमी..

अमळनेर/ प्रतिनिधी झाडी गलवाडे रस्त्यावर भरधाव चारचाकीने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना १८ रोजी घडली आहे.
शहरातील ढेकूरोड भागात राहणारे अभिमन्यू आत्माराम बागुल हे १८ रोजी त्यांच्या गावी झाडी येथे कामानिमित्त गेले होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास ते आपल्या दुचाकीने – अमळनेरकडे परत येत असताना झाडी ते गलवाडेदरम्यान समोरून येणाऱ्या इको गाडी (एमएच३९/एजे३१७०) चालकाने गाडी विरुद्ध बाजूने टाकत भरधाव वेगाने येऊन दुचाकीला धडक दिली.
दुचाकीस्वार अभिमन्यू पाटील हे फेकले गेल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. गाडीचालक कोणतीही मदत न करता पळून गेला. यावेळी ग्रामस्थांनी धाव घेत अभिमन्यू पाटील – यांना खासगी दवाखान्यात दाखल केले.