जळगावच्या बाफना ज्वेलर्सवर आयटीची धाड..

24 प्राईम न्यूज 22 Apr 2024.
जळगाव । प्रसिद्ध आर. सी. बाफना ज्वेलर्सवर रविवारी प्राप्तिकर विभागा (आयटी) ने धाड टाकली. लोकसभा निवडणुकीच्या तपासणीदरम्यान, बाफना ज्वेलर्सकडे ८ ते ९ किलो सोने आढळले होते. या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील बाफना ज्वेलर्सच्या नयनतारा शोरूममध्ये, शनिवारी रात्रीपासून प्राप्तिकर विभागाच्या पथकाने चौकशी सुरू केली होती. शनिवारी रात्री बाफना ज्वेलर्सचे ९ किलो सोन्याचे आणि १२ किलो चांदीचे दागिने औरंगाबाद आणि मुंबई येथून सुरक्षा यंत्रणेसह जळगाव येथे येत होते. याचदरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव औरंगाबाद रस्त्यावर पोलिसांनी नाकाबंदी लावली होती. यावेळी दागिन्यांचे वाहन अडविले असता, पोलिसांना तपासणीत मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने आढळून आले. या प्रकाराची माहिती प्राप्तिकर विभागाला देण्यात आली होती. या माहितीच्या आधारे प्राप्तिकर विभागाने बाफना ज्वेलर्स येथे या दागिन्यांच्या बाबत तपासणी केली.