वादळामुळे ७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित; पिंपळेमध्ये पाण्याची तीव्र टंचाई.            -विहिरीवरून पाणी भरण्यास महिलांची उडाली झुंबड.

0

प्रतिनिधी | अमळनेर

चिमणपुरी व पिंपळे खु. या दोन्ही गावे मिळून ग्रुप ग्रामपंचायत आहे. येथील लोकसंख्या सुमारे २१०० आहे. गावात शेतकऱ्यांच्या जनावरांची संख्याही भरपूर आहे. १२ रोजी अमळनेर तालुक्यात झालेल्या वादळी अवकाळी पावसामुळे येथील विजेचे खांब उन्मळून आडवे झाले. त्यामूळे परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. वीज नसल्याने ग्रामस्थांना पाणी मिळणे मुश्कील झाले होते. अशा वेळी गावाच्या महिला सरपंच वर्षा पाटील व त्यांचे पती युवराज पाटील यांनी आपल्या शेतातील विहिरीचे पाणी त्यांनी गावालगत आपल्या शेतात पाइपलाइनने पोहचवले. त्या विहिरीतील पाणी मोटारीने टँकरने भरून गाव विहिरीत टाकले जाते.

दिवसाला चार टँकर भरले जातात. तीन ते चार दिवसात सकाळी-संध्याकाळी गावात टप्याटप्याने पाणी सोडले जाते. जनावरांसाठी गावाबाहेर हौद केला असून तो सतत भरून ठेवला जातो. त्यामुळे कडक उन्हातही माणसांची तहान भागवली तशी जनावरांचीही तहान भागवली जात आहे. सरपंच वर्षा युवराज पाटील यांनी वीजपुरवठ्याअभावी गावात पाणीपुरवठा होत नसल्याने निर्माण झालेली टंचाई दूर करण्यासाठी आपल्या शेतातील पाणी टँकरने आणून गावाच्या विहिरीत टाकले. त्यामुळे तेथून ग्रामस्थांना सहज पाणी उपलब्ध होत असून टंचाईच्या काळात त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान आवश्यक दुरुस्ती करून तातडीने वीजपुरवठा सुरू करण्यासाठीही सरपंच वर्षा पाटील यांनी पाठपुरावा सुरू ठेवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!