४ दुकानांतून 9 किलो प्लास्टिक जप्त. – नगर पालिकेची धडक कारवाई, 6500 रूपये ठोठावला दंड.

0

अमळनेर /प्रतिनिधी. प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याने नगर पालिकेच्या पथकाने अचानक धडक मोहीम राबवूनचार दुकानदारांना एकूण 6500 रुपये दंड ठोठावला. येथून पथकाने 9 किलो प्लास्टिक जप्त केले . ही कारवाई मंगळवार सायंकाळी करण्यात आली.

नगर पालिकेच्या प्लास्टिक विरोधी पथकाने मंगळवारी सायंकाळी शहरातील नानेश ट्रेडिंग, आर के पावभाजी व चायनीज, महेंद्र चायनीज व यश चायनीज बाजार परिसर, अमळनेर या चार दुकानात बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या, पन्नी आढळून आल्याने कार्यवाही करण्यात आली. यात ज्ञानेश ट्रेंडिंग यांनी बंदी असलेल्या प्लास्टिक साठवणूक व विक्री केल्याबद्दल 5000/- तर आर के पावभाजी व चायनीज, यश चायनीज, महिंद्र चायनीज यांनी बंदी असलेल्या प्लास्टिक कॅरीबॅग मधून विक्री केल्याबद्दल प्रत्येकी 500/- रुपये दंड आकारण्यात आला. नगर परिषद मुख्याधिकारी श्री. तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी प्लॉस्टिक बंदी करत कारवाई करताना पालिकेचे स्वच्छता निरीक्षक संतोष बिऱ्हाडे , शहर समन्वयक गणेश गढरी, पथक कर्मचारी गौतम बिऱ्हाडे, योगेश पवार, महेंद्र बि-हाडे समाधान बच्छाव युनूस शेख आदी यांनी कार्यवाही केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!