लहान मुलांच्या भांडणावरून पाच जणांनी दोघांवर कोयता चालवला.

अमळनेर : प्रतिनिधी. लहान मुलांच्या भांडणावरून पाच जणांनी दोघांवर कोयता चालवला. याचबरोबर दगड, विटांनी मारहाण केली. ही घटना २० एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सावतावाडी झामी चौक भागात घडली. दोघेही जखमी धुळे येथे उपचार घेत आहेत.
फरीद शेख गुलामनबी यांना त्यांची बहीण सायराबी शेख युनूस हिच्याशी नाजियाबी युसूफ पठाण ही लहान मुलांच्या खेळण्यावरून भांडण करीत असल्याचा आवाज आला. ते घराबाहेर पडले असता कामील अफजलखापठाण आला. त्याने फरीदचे दोन्ही पाय ओढून खाली पाडले. त्याचवेळी त्याचा लहान भाऊ युसूफ ऊर्फ गुड्डू हातातील अफजल पठाण याने हातातील लोखंडी कोयत्याने फरीदच्या डोक्यावर वार केल्याने तो जखमी होऊन रक्तबंबाळ झाला. नाजिया युसूफ पठाण, रुखसाना अफजल पठाण, कामील पठाण, युसूफ पठाण यांनी विटा, दगडांनी व चापट- बुक्क्यांनी मारहाण करणे सुरू केले. हे भांडण सोडविण्यासाठी फरीदचे मेव्हणे सय्यद मुस्ताक सय्यद अब्बास हे आले असता युसूफ ऊर्फ गुड्डू याने त्यांच्यावर लोखंडी कोयत्याने वारपठाण आला. त्याने फरीदचे दोन्ही पाय ओढून खाली पाडले. त्याचवेळी त्याचा लहान भाऊ युसूफ ऊर्फ गुड्डू हातातील अफजल पठाण याने हातातील लोखंडी कोयत्याने फरीदच्या डोक्यावर वार केल्याने तो जखमी होऊन रक्तबंबाळ झाला. नाजिया युसूफ पठाण, रुखसाना अफजल पठाण, कामील पठाण, युसूफ पठाण यांनी विटा, दगडांनी व चापट- बुक्क्यांनी मारहाण करणे सुरू केले. हे भांडण सोडविण्यासाठी फरीदचे मेव्हणे सय्यद मुस्ताक सय्यद अब्बास हे आले असता युसूफ ऊर्फ गुड्डू याने त्यांच्यावर लोखंडी कोयत्याने वारपठाण आला. त्याने फरीदचे दोन्ही पाय ओढून खाली पाडले. त्याचवेळी त्याचा लहान भाऊ युसूफ ऊर्फ गुड्डू हातातील अफजल पठाण याने हातातील लोखंडी कोयत्याने फरीदच्या डोक्यावर वार केल्याने तो जखमी होऊन रक्तबंबाळ झाला. नाजिया युसूफ पठाण, रुखसाना अफजल पठाण, कामील पठाण, युसूफ पठाण यांनी विटा, दगडांनी व चापट- बुक्क्यांनी मारहाण करणे सुरू केले. हे भांडण सोडविण्यासाठी फरीदचे मेव्हणे सय्यद मुस्ताक सय्यद अब्बास हे आले असता युसूफ ऊर्फ गुड्डू याने त्यांच्यावर लोखंडी कोयत्याने वारकेला. त्यांनी तो हातावर अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली. फरीदचा भाचा इम्रान शेख युनूस याने दोघांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले.
पोलिसांनी दवाखान्यात घेतलेल्या जबाबावरून फरीदच्या फिर्यादीवरून पाचही जणांविरुद्ध दंगल व गंभीर मारहाणीचा गुन्हा २२ एप्रिल रोजी उशिरा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत.