मी समाजवादी पक्ष कदापि सोडणार नाही-अबू आझमी..

24 प्राईम न्यूज 24 Apr 2024
◆ मुंबई । पक्षश्रेष्ठींविषयी आपली नाराजी नसून मी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही. हवे तर मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, असा निर्वाळा देत समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी मंगळवारी पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम दिला, मात्र आमच्या पक्षाने महाराष्ट्रात लोकसभेच्या किमान एक-दोन जागा तरी लढवायला हव्या होत्या, अशी मागणी पक्षाच्या वरिष्ठांकडे केल्याची माहिती त्यांनी दिली. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीनंतर आझमी राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.